कोपरगाव येथील योग वर्गातील महिलांचा एक आगळा वेगळा गणेशोत्सव होतो साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील महिलांकडून साजरा होतो गणेशोत्सव, कोपरगाव योग वर्गातील महिलांचा एक आगळा वेगळा गणेशोत्सव , जेथे ना स्टेज , ना मुर्ती , ना सजावट, ना आर्थिक व्यवहार, समाजाने भेदभाव विसरून एकत्र येऊन समाजात ऐक्य प्रस्थापित करणं , सांघीक पद्धतीने ईश्वराची भक्ती करणं , कृतज्ञता भाव जोपासणं व निर्माण झालेल्या संघ शक्तीचा उपयोग समाजासाठी , देव देश धर्मासाठी होणं अपेक्षित आहे .सार्वजनिक गणेशोत्सवाची ही खरी संकल्पना आहे . ही संकल्पना जोपासण्यासाठी महिलांकडून प्रयत्न केला जातो . सर्व महिला मोठ्या भक्तिभावाने निर्गुण निराकार स्वरूपातील श्री गणेशाची व आरोग्य देवता सूर्य नारायणाची उपासना करतात . गंगा गोदावरी नदीची स्वच्छता व पावित्र्य राखण्यासाठी जनजागृती करतात . गंगा गोदावरी मातेचीही मोठ्या भक्तिभावाने पूजन व आरती केली जाते.
या उपक्रमात योग शिक्षक श्री.पुंडे सर व सौ.पुंडे मॅडम यांचे मोठे योगदान आहे.तसेच सौ.राजश्री दौलतराव जाधव,सौ. मंदाकिणी नारायण बारे, सौ.डॉ.सुषमा आचारी,सौ.शारदा सुरळे यांनी आपले मनोगत मांडले. या आगळ्या वेगळया उपक्रमात भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *