
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालय चे संस्थापक कै.गोकुळचंदजी ठोळे यांची १४६वी जयंती विदयालयात उत्साहाने संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.जे.एस हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद कातकडे,लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.परेश उदावंत,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोसावी, प्रशासन अधिकारी डी.डी.पटारे उपस्थित
होते.
प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्याच्या परीचय करुन दीला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.विदयालयांच्या जेष्ठ शिक्षिका सौ.एस.ए.अजमेरे यांनी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या कार्याचा आलेख स्पष्ट केला.
लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना या शाळेने संस्कार केले म्हणुनच आम्ही घडलो असे सांगितले.प्रशासन अधिकारी डी.डी.पटारे यांनी श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठे कार्य असुन गुणवत्ता प्राप्त व दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा आजही टीकुन आहे असे स्पष्ट केले. संस्थेचे सचिव दीलीप अजमेरे यांनी श्रीकृष्ण जयंती निमित्त सर्वाना शुभेच्छा दील्या व जसे कर्म कराल तसे फळ मिळेल या उक्तीचा विसर पडु देवु नका असे सांगितलं.
अध्यक्ष पदावरुन कैलास ठोळे यांनी भाषण करतांना विदयार्थीनी खडतर परीश्रम घेवुन यश संपादन करावे आणि विदयालयांचा पर्यायाने आपला स्वतःचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी एस.एस.सी. परीक्षेत यश संपादन केलेल्या तेजस जाधव व इतर विद्यार्थींचा मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला.
या प्रसंगी श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,श्री.विलास ठोळे,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिना पाटणी ,भागचंद माणिकचंद इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य श्री.एम.एस. निमोणकर,पर्यवेक्षिका यु.एस.रायते मॕडम,विविध पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विदयार्थी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी केले. तर आभार श्री.पी.बी.जगताप यांनी मानले.
