
कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):-
मराठी पत्रकार परिषदेचे येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर येथे होणारे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन काही अपरिहार्य कारणास्तव रद्द केले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या काल रात्री झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. अधिवेशन रद्द करावे लागत असल्याने राज्यातील पत्रकार मित्रांची जी गैरसोय झाली त्याबद्दल या बैठकीत दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
अधिवेशनाची नवी तारीख आणि नवे स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल. परिषदेचे अधिवेशन परिषदेच्या नियमानुसार आणि परिषदेच्या परंपरेनुसारच होईल, याची शाश्वती अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
