कोपरगाव शिवसेनेचे कार्य कौतुकास्पद:- डॉ. दत्तात्रय मुळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवराष्ट्र तरुण मंडळ शिवसेना उपशाखेच्या वतीने शिवसेना नेते उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाकरे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज व वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. रक्तदान करण्यासाठी सकाळ पासूनच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास आरोग्य क्षेत्रात काम करत असलेले कोपरगावतील सुप्रसिद्ध डॉक्टर दत्तात्रय मुळे सर यांनी उपस्थिती लावली व कोपरगाव शिवसेनेने घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांचे अभिनंदन केले. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्यातील रक्तसाठा रिक्त राहू नये यासाठी जनतेला रक्तदान करण्यास वारंवार आवाहन केले आहे. त्यालाच सकारात्मक प्रतिसाद देत हा स्तुत्य उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबत असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. या वेळी डॉ.विरेश भाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे रक्तदानासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून दिल्याने शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिकांनी आभार मानले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉ.नागरे,डॉ.संकेत मुळे,डॉ.गिरमे,डॉ.अतिश काळे,डॉ.हेमंत राठी,प्रसिद्ध बिल्डर प्रसाद नाईक,जेष्ठ शिवसैनिक संजय उदावंत,संतोष सोनवणे,हशमभाई पटेल,दिलीप अरगडे,युवासेना सह सचिव सुनील तिवारी,मा.नगरसेविका वर्षाताई शिंगाडे,मा.नगरसेवक रमेश गवळी,मेहमूद सय्यद,युवासेच्या अक्षिता आमले,महिला आघाडी उपशहरप्रमुख अश्विनी होणे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरास नगर येथील जन कल्याण ब्लड बँकेचे व भाकरे हॉस्पिटलचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवानेते विक्रांत झावरे,संजय बाविस्कर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके,उपशहरप्रमुख विकास शर्मा,शेखर कोलते,प्रफुल्ल शिंगाडे,सुनील कुंढारे,योगेश उशीर,किरण अडांगळे, मयूर दळवी,वसीम शेख,शेतकरी सेनेचे किरण खर्डे,संतोष झावरे,समन्वयक सागर सोमवंशी,संघटक वैभव गिते,सहसंघटक दिपक बरदे,वाहतूक सेनेचे अमजद शेख,जाफर सय्यद,अविनाश वाघ,अविनाश धोक्रट,किरण कुऱ्हे,राकेश वाघ,विभागप्रमुख शैलेश वाघ,विजय सोनवणे,सतीश शिंगाणे,निखिल मढवई,मधू पवार,विजय शिंदे,भूषण वडांगळे,निशांत झावरे,सुशील बोर्डे,अंबादास वाघ,अरुण बोराडे,अतुल नागरे,संकेत देवरे,रविंद्र पवार,दिपक चौधरी,निलेश पवार,नरेश बैरागी, दिपक दळे,श्रीपाद भसाळे,गोविंद चव्हाण,शुभम औताडे, किसन बर्डे,सागर भास्कर,योगेश जोशी,प्रवीण शेलार,अशोक पवार,सचिन मोरे,अक्षय वर्मा,अमोल तवरेज, आकाश कर्डिले,अविनाश गुजर, शंकर गुजर, अजय खैरनार, दत्तू शेलार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *