योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा कोकमठाणकरांना दिला नारळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार .

परंपरेनुसार सदरचे नारळ पुणतांबा या ठिकाणी एकादशीच्या दिवशी दिले जाते. परंपरेनुसार सप्ताह चे नारळ श्रीक्षेत्र पुणतांबा येथे कोकमठाण ग्रामस्थ व पंचक्रोशी येथील भाविकांनी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज दि २४;जुलै रोजी दुपारी १ वाजता कोकमठाण येथे होणाऱ्या सप्ताहाची अधिकृत घोषणा केली व महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते नारळ घेतले यावेळी कोकमठाण पंचक्रोशी येथील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *