मराठा विकास फाउंडेशन च्या वतिने नामदार आशुतोष काळे,युवा नेते विवेक कोल्हे, मा. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील मराठा विकास फाऊडेशनच्या वतिने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे.रक्तदान शिबिर,पुरग्रस्तांना मदत, मोफत आधार कार्ड शिबिर, आपत्तकालिन वेळेस २४ तास मदतीचा उपक्रम,मोफत ई.श्रम कार्ड ,एस.टी.महामंडळ ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी,मोफत शेतकरी कर्ज माफी योजनेचे फार्म भरणे,आदि उपक्रम राबविण्यात आले आहे.
नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणूक संपन्न झाली यामध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आशुतोष काळे तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या चेअरमन पदी विवेक कोल्हे यांची निवड झाली आहे.त्याच बरोबर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना सकाळ समूहाचा आयडाँल महाराष्ट्र पुरस्कार मिळाला या निमित्ताने मराठा विकास फाउंडेशन (ट्रस्ट)कोपरगाव च्या वतिने नामदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी
अध्यक्ष:-राहुल (ज्ञानेश्वर)आढाव,
उपाध्यक्ष:-संतोष पेकळे,
सचिव:- संतोष कुटे,
विश्वस्त –
अनिल शिंदे, शशिकांत दवंगे,शशिकांत गायकवाड, एकनाथ लामखडे,प्रसाद कदम,सचिन शेळके, संदीप आहेर,अनंत गोडसे,,श्री जाधव, धनराज राऊत,राहुल गायकवाड, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *