राहाता पंचायत समिती १२ गण व १२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत:- तहसीलदार कुंदन हिरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांची व १२ ग्रामपंचायतींची आरक्षणाची सोडत अनुक्रमे २८ व २९ जूलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे‌.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ६ गण महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जाती २ (१ महिला), अनुसूचित जमाती १ (फक्त महिला), नागरिकांचा मागासप्रवर्ग ३ (२ महिला), सर्वसाधारण ६ (२ महिला) अशी आरक्षण सोडत काढली जाणार आहे‌‌. राहाता पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली जाणार आहे.२९ जुलै रोजी १२ ग्रामपंचायतींमधील विशेष ग्रामसभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी लॉट अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. नागरिक व पदाधिकारी यांनी आरक्षण सोडतींसाठी उपस्थित राहावे. असे आवाहन कुंदन हिरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *