
कोपरगाव प्रतिनिधी:-
वैशाख वणवा सरताना पाणगळ होते उन्हाळा संपताना झाडं ओकी बोकी होतात
साधारण सात जुनला मृग नक्षत्रात पाऊस सुरू होतो आणि निसर्गाच्या छटा बदलू लागतात पाऊस पडू लागताच ओकीबोकी झालेली झाडे हिरवीगार होताना दिसतात निसर्गात चैतन्य निर्माण होते आणि माणुसहि चैतन्यमय होतो डोंगर हिरवे होऊ लागतात पाऊस सुरू राहीला तर धबधबे कोसळू लागतात आणि मग तरुणाई कुठेतरी सहलीला निघते

अतीऊतसाहि नको ते साहस करताना दिसतात स्वतः चा जीव गमावून घरच्यांना दुःखात टाकतात काळजी घेऊन आनंद साजरा झाला पाहिजे
निसर्ग खुणावतो आहे आनंद घ्या आनंद द्या हिच निसर्गाची शिकवण आहे सुख आणि दुःख येत आणि जाते दिवस रात्र कधी थांबत नाही बदल हा सृष्टीचा नियम आहे
साचलेले पाणी साकळते वाहते पाणी स्वच्छ राहते निसर्गाच्या प्रमाणे जीवन जगा आनंदाने जगा म्हणून निसर्गाने वरदान दिले आहे
झाडे लावा झाडे जगवा
चैतन्य निर्माण करा चिरंतन आनंदी उत्साही समाधानी आरोग्य संपन्न रहा
