उमरावती सहकारी सोसायटी 30 जुनच्या आत १००% बार होणारी सर्वप्रथम संस्था विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून नवनिर्वाचित संचालक व सभासदांचे अभिनंदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटी 30 जुनच्या आत बैंक पातळीवर शंभर टक्के बार होणारी सर्वप्रथम संस्था ठरल्याबद्दल संचालक विवेक कोल्हे यांनी नवनिर्वाचित संचालक व सभासदांचे अभिनंदन केले.
या संस्थेचे संस्थापक व सहकारमहर्षी शंकरराव काहे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुणराव येवले, अध्यक्ष देवराम गवळी, उपाध्यक्ष साहेबराव शिंदे व सचिव अशोक घेर यांनी बैंक पातळीवर सर्व थकबाकी बार करण्यावर भर देत सर्व सभासदांशी व्यक्तीगत संपर्क केला तालुक्यात उमरावती सहकारी संस्था अहमदनगर जिल्हा सहकारी बैंक पातळीवर उत्लेखनिय कामगिरी करणारी पहिलीच संख्या ठरली आहे त्याबद्दल त्यांचे व सचिवांचे सर्वत्र केतुक होत आहे. हिंगणवेढे व शिलेदारवाडी या संख्या देखील शंभर टक्के बार झाल्या आहेत.
संस्थापक अरुणराव येवले म्हणाले की, सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग सुरु होतो. त्यामुळे प्रत्येकाने सोसायटी आपली मातृ संस्था आहे असे समजुन कार्य करावे त्यातच सर्व सभासदांचे हित आहे. युवानेते विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेच्या सर्व योजना सोसायट्यांपर्यंत पोहोचवून त्यात गुणात्मक काम करून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *