
कोपरगाव प्रतिनिधी:-
उपेक्षित व वंचीत घटकांचे प्रश्न व समस्या सारख्या असून त्या सोडवायच्या असतील तर उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन लढा उभा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्रा रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केले
प्रा भरांडे यांनी नुकतीच कोपरगाव येथे भेट दिली त्या वेळी विविध समाज संघटना व त्यांचे नेते यांनी प्रा भरांडे यांची भेट घेतली त्या वेळी बोलताना प्रा भरांडे म्हणाले की उपेक्षित व वंचित घटकांचे प्रश्न व समस्या समान आहेत मात्र आपण वेगवेगळे लढून आपल्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत आजही अनेक समाज संघटना व नेत्यांना आपल्या समाजाच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी निवेदन, आंदोलन, मोर्चे उभे करावे लागत आहेत केंद्र आणि राज्यात सद्या अंधा जाणून सुरू असून ही दोन्ही सरकारे संधी साधू आहेत यापूर्वी केंद्रात आसलेले सरकार ला सर्व सामान्यांचे प्रश्न समजले नाही तर सद्याचे सरकार जातिद्वेषाचे राजकारण करत आहे तर राज्यातील सरकारला सर्व सामान्य जनतेच्या पाणी,वीज रस्ते बेरोजगारी हे कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत त्यांना फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी आहे मात्र एक वर्ष होऊन गेले तरी मागासवर्गीय महामंडळाच्या नियुक्त्या होत नाही त्यामुळे या उपेक्षित समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत
अनुसूचित जाती मधील अनेक उपजातींना आरक्षणाचा लाभ होत नाही त्यामुळे या उपेक्षित जातीना एकत्र आणून अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे या साठी दहा लाख सह्यांची मोहीम उभारली आहे.
आपल्या समस्या या सारख्या असून त्या सोडवण्या साठी उपेक्षित घटकांनी किमान समान कार्यक्रम राबवून एकत्र लढा उभारणे गरजेचे आहे
या वेळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सुनील फंड,अनिल गायकवाड, लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ सोमनाथ म्हस्के , सुजल चंदनशिव घटनाकार मैत्री संघाचे नितीन बनसोडे,शिव सेनेचे युवा नेते व मेहतर समाजाचे गगन हाडा,मुस्लिम समाजाचे लियाकत सय्यद, खालिद कुरेशी रवी शेलार ,लक्ष्मण साबळे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
