सलग ९ वर्षे एनबीए मानांकन प्राप्त असणारी ग्रामिण महाराष्ट्रातील एकमेव संस्था...
कोपरगांव प्रतिनीधी:-
संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या चार विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल करून संजीवनी पाॅलीटेक्निकच्या दर्जा आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. यापुर्वी या संस्थेला सलग सहा वर्षांचे मानांकन मिळाले होते, आता पुन्हा तीन वर्षांचे मानांकन मिळाल्यामुळे संजीवनी पाॅलीटेक्निक हे सलग नऊ वर्षे एनबीए मानांकन प्राप्त करणारे ग्रामिण महाराष्ट्रातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पाॅलीटेक्निक ठरले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी दिली आहे.
संजीवनी पाॅलीटेक्निकच्या या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री. नितीनराव कोल्हे व श्री अमित कोल्हे यांनी प्राचार्य ए.आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख, कार्यालयिन अधिक्षक आणि समन्वयक यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी चिफ टेक्निकल डायरेक्टर श्री विजय नायडू, प्रशासकिय अधिकारी श्री प्रकाश जाधव, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. बाबासाहेब काकडे, प्रा. आय. के. सय्यद, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. किशोर जाधव, प्रा. योगेश जगतापव प्रा. मोहीनी गुंजाळ उपस्थित होते.
पत्रकात श्री. कोल्हे यांनी म्हटले आहे की २०१६ साली एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी पाॅलीटेक्निक हे ग्रामिण महाराष्ट्रातील एकमेव पाॅलीटेक्निक होते. त्यावेळी दोन वर्षांचे मानांकन प्राप्त झाले होते. ही मुदत संपण्याच्या अगोदरच संजीवनी पाॅलीटेक्निकने पुर्तता अहवाल सादर करून पुन्हा एक ववर्षाचं मानांकन प्राप्त केले. ही मुदत संपण्याच्या अगोदरच पुन्हा पुर्तता अहवाल सादर करून एनबीए समितीला सामोरे जावुन पुन्हा तीन वर्षांचे मानांकन प्राप्त केले. असे एकुण संजीवनी पाॅलीटेक्निकला एकुण सहा वर्षांचे मानांकन प्राप्त झाले होते. ही मुदत संपण्यापुर्वीच या पाॅलीटेक्निकने फेर मुल्यांकण करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार एनबीए समितीने मागील महिन्याच्या १३, १४ व १५ मे ला येथे भेट देवुन विभाग निहाय व संस्था पातळीवर विविध निकषांच्या आधारे पुराव्यांसहित तपासणी केली. यात विशेषतः मागील तीन वर्षातील प्रत्येक विभागातील प्रवेश संख्या, पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी आणि पी.एच.डी. असणारे शिक्षक, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सलग तीन वर्षात उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विध्यार्थ्यानी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा, अशा अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर जुनच्या पहिल्या आठवड्यातच सिव्हील, मेकॅनिकल, काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या चार विभागांना पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले.
महाराश्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात अनेक पाॅलीटेकिनक संस्था आहेत. परंतु फार थोड्या संस्था एनबीए च्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातुन आत्मविश्वासाच्या जोरावर सहा वर्षांपूर्वी एनबीए च्या कसोट्याांना सामोरे जाण्याचे संजीवनी पाॅलीटेक्निकने धाडसी पावुल टाकले. गुणवत्ता टिकवुन ठेवत पुन्हा तीन वर्षांसाठी मानांकन न प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे श्री. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

फोटो ओळीः संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकला पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन प्राप्त झाल्याबध्दल कार्याध्यक्ष श्री. नितीनराव कोल्हे व श्री अमित कोल्हे यांचे हस्ते प्राचार्य, विभाग प्रमुख व मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.
