प्रकाशभाऊ कोपरे यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीत शोककळा पसरली आहे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.४-२-२१ रोजी गुरुवारी सायंकाळी ८-०० वा. कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश त्र्यंबक कोपरे यांचे वयाच्या ६०व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार असून, पत्रकार स्वप्नील कोपरे यांचे वडील, त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीला वाहून घेतले होते.
केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून ते प्रचलित होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना रस्ता रोको,दलीतांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन , अशा विविध प्रकारचे आंदोलन केले. त्याच बरोबर खासदार आठवले साहेबांना मोठे करण्यात कोपरगाव कर यांचा सिंहाचा वाटा असून त्यामध्ये अग्रेसर प्रकाश भाऊ कोपरे यांचे नाव घेतले जाते. भाऊंचा स्वभाव मनमिळाऊ होता. प्रकाशभाऊ कोपरे यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीत शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *