कोपरगाव मध्ये उद्या काँग्रेस संवाद मेळावा…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- काँग्रेस कमिटी तर्फे राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि.६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता समता सभागृह या ठिकाणी ना.बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,समन्वयक ज्ञानदेव वाफारे,कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मिनलताई खांबेकर यांच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार असून संघटनात्मक बाबी,रणनीती,कार्यकर्ता प्रशिक्षण तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन तथा संवाद होणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे तसेच शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी दिली.कार्यक्रमानंतर कोपरगाव महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ऍड.शीतल देशमुख,महिला काँग्रेस शहराध्यक्षा रेखाताई जगताप यांनी दिली.काँग्रेस विचारधारेला मानणाऱ्या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *