श्री.स्वामी समर्थ केंद्र शहा कारवाडीत बाल संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न:- संतोषभाऊ जाधव…

Uncategorized

मराठा विकास फाउंडेशनच्या वतीने कारवाडी येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रांचे प्रमुख संतोषभाऊ जाधव व सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला…

आजच्या धकाधकीच्या काळात संस्कार होणे गरजेचे आहे:- संतोषभाऊ जाधव…

कोपरगाव प्रतिनीधी:-
प.पू.गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने २३ मे पासून कारवाडी शहा या ठिकाणी बाल संस्कार शिबिरास प्रारंभ झाला गेल्या 23 मे चालू असलेले बालसंस्कार व त्याचा 31 मे रोजी विद्यार्थी पालक मेळावा घेण्यात आला.


त्यामध्ये जवळजवळ 600 विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्तित होते.त्यामध्ये मुलांकडून मंत्र ,स्तोत्र,योगा करून घेण्यात आला.नंतर आईवडीलाचे पाद्य पूजन करण्यात आले.या पाद्य पुजनमध्ये आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांचे पूजन केले.

आपल्या आई वडिलांना गळा भेट घेवुन शमा याचना, प्रार्थना प्रेमभावना प्रकट केल्या याप्रसंगी अनेक माता पित्यांच्या बालकांच्या डोळ्यात अश्रु आले होते.खरोखर या ठिकाणी मुलांना संस्कार दिले जात आहे.असे दिसून येत आहे.आजच्या आधुनिक युगात टी.व्ही.मोबाईल मुळे आणि त्यावरील मालिका व चित्रपटामुळे आजची पिढी बरबाद होत आहे. मुलांना आज संस्काराची नितांत गरज आहे.आजच्या धकाधकीच्या काळात संस्कार होणे गरजेचे आहे.या केंद्रात खरोखर संस्कार केले जातात.असे बघायला मिळत आहे.गेल्या 10 दिवसामधे जे काही शिकवले त्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.त्यामध्ये आम्हाला आमच्या धर्माबद्धल राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण करण्यात आले,असेही मुलानी सांगितले.
आमच्यातील आळस दूर झाला ,आमचा टीव्ही-मोबाईल पासून सुटका झाली व आम्ही आता आई वडिलांचे दर्शन घेऊन त्यांचा आदर करतो.अनेक पालकांनी देखील आपले आपल्या पाल्याबद्दल चे मत व्यक्त करतांना त्यांच्यामध्ये झालेल्या सुधारना याबद्दल आपले मत व्यक्त केले.


अनेक पालकांच्या डोळे देखील पानावले होते.की आमच्या मुलांमध्ये गेल्या एवढ्या दिवसात एवढा बदल नाही करू शकलो.तो तुम्ही 10 दिवसात करून दाखवला व एक आदर्श माणूस तुम्ही बनवून दाखवला.
हे मत व्यक्त करतांने पालकांनी बालसंस्कार शिबीर चालकांचे आभार मानण्यात आले.

हे शिबीर आसपासच्या
कोळपेवाडी ,वडांगळी,मायगाव,
देवपूर ,सोमठाणे याठिकाणी देखील तेथील सेवेकानी हे शिबीर आयोजीत करून तेथे घेण्यात आले. यामध्ये आदरांनीय संतोष भाऊं जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
कारवाडी केंद्रात –
राजू चव्हाण
योगेश खुळे
रवी गुंड
संभाजी पानगव्हाणे
गणेश आहेर
स्वाती ताई जगताप
सुनीता ताई जाधव
अंजली ताई गाडे

सोमठाणे येथील- अतुल सर उगले
देवपूर येथील – बापू भाऊ बिडवे
मायगांव येथील – राहुल भाऊ साबळे
कोळपेवाडी येथील- कोल्हे सर
वडांगळी येथील – कल्पेश कुलथे

या सेवकांनी आपली सेवा रुजू केली.
या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करून सगळं सांभाळून घेणारे अण्णा भाऊ फरताळे
विकास भाऊ जाधव
आनंद भाऊ आव्हाड
गणेश चिरके
प्रमोद लोखंडे सर
किशोर भाऊ जाधव
केदार तनपुरे मंगेश जाधव
यांनी देखील सेवा रुजू केली.याप्रसंगी मराठा विकास फौंऊडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल (ज्ञानेश्वर) आढाव उपाध्यक्ष संतोष पेकळे, सचिव संतोष कुटे , सदस्य अनिल शिंदे , शशिकांत दवंगे, सचिन शेळके, राहुल गायकवाड,शशिकांत गायकवाड, आनंत गोडसे, एकनाथ लामखडे, धनराज राऊत संदीप (बॉबी) आहेर,सोमनाथ ढवळे. यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा विकास फाऊडेशनच्या वतिने संतोष भाऊ जाधव यांचा सत्कार करण्यात आला आहे.

कार्यक्रम संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *