भारताच्या बॅडमिंटनपटूंनी थॉमस कप जिंकुन जागतिक स्तरावर नांवलौकीक मिळवला:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
चौदावेळा जागतिक स्तरावर जिंकलेल्या इंडोनेशिया संघाचा भारतीय बॅडमिंटनपटूंनी अलौकीक खेळ करत आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया या मोहिमेला दिलेल्या पाठबळामुळेच आपल्या खेळाडूंनी ऐतिहासिक करून दाखवली आहे, थॉमस कप जिंकुन देत जागतिक स्तरावर नांवलौकीकास्पद कामगिरी केल्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतीय युवा बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन केले आहे.
थॉमस कप भारताला पहिल्यांदाच मिळाला. यात युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, लक्ष्य सेन, एचड प्रण्णाव, किदंबी श्रीकांत, सात्वीक साईराज रानीकी रेड्डी यांनी उत्तम कामगिरी करत इंडोनेशिया संघाला बँकॉक थायलंड येथे ३_०० ने पराभव केला. इंडोनेशिया, चायना, मलेशिया, जपान आणि डेन्मार्क या पाच देशांचे वर्चस्व या थॉमस कप वर होतं त्यावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे हा मोठा योगायोग आहे. भारत देशाने आजवर विविध खेळात राज्य, देश तसेच ऑलींम्पीक स्पर्धेत गुणात्मक कामगिरी करून असंख्य पारितोषके मिळवून दिली. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळात सर्वाधीक शतके करून विक्रम केला, त्याचबरोबर क्रिकेटचा विश्वकपही जिंकला. भारताचे बॅडमिंटनपटू युवा खेळाडू यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे प्रशिक्षक यांचा हा मोठ सन्मान आहे. सलग चौदावेळा थॉमस कप जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला हरवणे सोपे नव्हते. खेळात सातत्य, जिद्द, महत्वकांक्षा असली की, यश चालून येते. भारतीय संघाला थॉमस कप मिळाला ही बाब जागतिक स्तरावर कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *