जनतेच्या प्रश्नासाठी विवेकभैय्या कोल्हे यांची तळमळ भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांचे प्रतिपादन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनआक्रोश आंदोलन यशस्वी केले, जनतेच्या प्रश्नासाठी त्यांची तळमळ अतिशय योग्य होती असे प्रतिपादन जेऊर कुंभारी गावातील भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केले.
श्री सुधाकर वक्ते पुढे म्हणाले की, जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यामातुन महाविकास आघाडी सरकारला जाग आणणे हा मुख्य उद्देश होता. सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे गरजेचे होते.
आत्ताची परिस्थिती बघता शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. पाणी असून देखील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. तोंडी आलेला घास हिरावला जात आहे. पंचनामे होऊन देखील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. विस्थापित टपरीधारक गरजूंना रेशन कार्ड, घरकुल, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ यासह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी फक्त देखावा करण्यात मश्गुल आहेत. दर आठवड्याला ते आभासी माध्यमातून पुड्या सोडतात.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे हे सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी रस्त्यावर उतरून संघर्ष करतात. ग्रामीण भागातील एसटी बस सेवा सुरू व्हावी हे निवेदन त्यांनी दोन मे रोजी दिले मात्र जाड गेंड्याच्या कातडी असलेल्या तहसील प्रशासनाने ते कोपरगाव आगारापर्यंत पोहोच केले नाही, त्यामुळे डाऊच परिसरात दुर्दैवी अपघातात सात व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या.
ग्रामीण, व शहरी भाग, तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात संजीवनी युवा प्रतिष्ठान करीत असलेल्या जनसामान्यांच्या प्रश्नांना साथ देऊन विवेकभैय्या कोल्हे यांच्या माध्यमातून अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रतिसाद देत असतात. विवेक कोल्हे यांनी कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांची विशेष काळजी घेतली. सामाजिक कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जैन विकासाचे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यातून गोरगरिबांच्या मुला, मुलींचे मोफत विवाह करून दिले जात आहे. राजकारणापेक्षा त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *