
कोपरगांव प्रतिनिधी:-
ग्रामिण भागातील लाभार्थी हे शासकीय योजनात आपला सहभाग देवुन त्यात जीव तोडुन काम करतात, बहुमजली इमारतीच्या राज्यस्तरीय पुरस्कारात देर्डे को-हाळे गांवचे राजेंद्र संपतराव देशमुख यांचा सन्मान झाला ही बाब सर्वांनाच प्रेरणा देणारी असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
महाविकास अभियान २०२१ चे पुरस्कार नुकतेच जाहिर झाले असुन त्यात कोपरगांव तालुक्यातील मौजे देर्डे ग्रामपंचायत हददीतील घरकुलाचे लाभार्थी राजेंद्र संपतराव देशमुख यांचा राज्यस्तरावर सन्मान झाला असुन त्यांनी बांधलेल्या बहुमजली इमारतीस राज्यस्तरावरील दुसरा क्रमांक मिळाला आहे त्याबददल त्यांचे सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी अभिनंदन केले. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष, संचालक अरूणराव येवले यांनी प्रास्तविक केले. सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनामार्फत असंख्य योजना ग्रामिण भागातील उपेक्षीत घटकांसाठी सातत्याने येत असतात त्यात सर्वचजण सहभाग घेतात परंतु राजेंद्र देशमुख या लाभार्थ्याने शासनाच्या या योजनेत स्वत:चाही सहभाग देत -आपले नांव राज्यस्तरावर झळकवले आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. यशवंत पंचायत राज अभियान, पंचायत सशक्तीकरण अभियान आदि योजनांत लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य करून जास्तीत जास्त सहभाग द्यावा असेही त्या म्हणाल्या. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी राजेंद्र देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.
