
कोपरगाव प्रतिनिधी:-
यंदा अक्षय्य तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी आल्याने आनंद द्विगुणित झाला एकमेकांना शुभेच्छांची देवाणघेवाण झाली
रमजान ईद निमित्त ऊर्दू भाषिक लेखक मौलाना यासीन मिलली यांनी शिरखुरमा स्नेह मेळावा आयोजित केला होता या वेळी वात्रटिकाकार परखड लेखक अविनाश मंसाराम पाटील पत्रकार सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते रविंद्र साबळे इंजिनिअर दिवेकर साहेब छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर आदि उपस्थित होते सामाजिक विषयांवर विचार मांडले गेले या प्रसंगी मौलाना यासीन मिलली यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र – बचपणसे पचपण चक- हे भेट देऊन सन्मानित करण्यात आले
सदरच्या ग्रंथातून बालपणीच्या आठवणी जून्या कोपरगाव शहराची ओळख करून दिली आहे बदलत्या काळानुसार माणूस कसा बदलतो याचे यथार्थ वर्णन केले आहे नव्या पिढीला ईतीहासाची ओळख करून दिली आहे चालीरीती परंपरा संस्कृती रितीरिवाज या ग्रंथातून त्यांनी मांडले आहे
या प्रसंगी अविनाश पाटील रवींद्र साबळे दिवेकर साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
