

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात 2018 साली घर मालकाचा विश्वास संपादन करून सुमारे साडे अकरा तोळे सोने चोरी करून फरार झालेल्या जोडप्याचा कोपरगाव शहर पोलीसांनी लावला शोध.
कोपरगाव शहरात २०१८ साली गांधीनगर भागातील महेश नारायण कडलग यांच्या घरातील खोली भाडोत्री घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून जवळपास साडे अकरा तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास लागला असून या गुन्ह्यातील एक महिला स्मिता उर्फ प्रिती उर्फ प्रिया नवनीत नाईक वय 36 व पुरुष नवनीत मधुकर नाईक वय 41राहणार शिवाजी नगर भांडुप पश्चिम मुंबई या दोघांना कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास आतापर्यंत प्रलंबित होता अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घेतला असता अशा प्रकारचे गुन्हे बारामती येथे झाल्याचे कळाले या संदर्भातील आरोपी हे येरवडा कारागृहात आहे अशी माहिती हस्तगत झाली त्यानंतर या आरोपींना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर सदर मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास लावण्याकामी अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर डॉ दिलापी काळे, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शिर्डी संजय सातव, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलिस कॉन्स्टेबल मनोज काटे, गणेश थोरात ,महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रिती बनकर,होमगार्ड अमोल दराडे यांनी केला.
सदर गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल शहर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांनी पोलिस कोठडी देण्यात आली मात्र ते दोन्ही आरोपी कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी घेण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी कोव्हिडं केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे.
