रसवंती, कोपरगाव:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
उन्हाळ्याची चाहूल लागली की रसवंती गृह सजू लागतात तर काही ठिकाणी वर्षभर ऊसाचा ताजा रस मिळण्याची सोय असते
ऊसाचा ताजा रस थकल्या भागल्या जीवाला तरतरी आणतो बरीच माणसं रात्री जेवण झाल्यावर शतपावली करत ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतात
अस म्हणतात की माणसाच्या मुखात रसवंती असावी साखरपेरणी करणारी गोडबोले माणसं तशी कमी नाहीत तर खौट बोलणारी टोमणे मारत शेलापागोटे देत खोचकपणे बोलणारी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत
किमान आपल साध्य साधण्यासाठी मुखात रसवंती धारण करणारी माणसं धोकादायक ठरू शकतात
रसवंती एक शब्द नाही तर खूप काही आहे रसवंती अनेक प्रपंच चालवते अनेकांना रोजगार देते तीस चाळीस वर्षांपूर्वी लाकडी चरक बैलांच्या साह्याने चालवून रस काढून विकत प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात मशीनरी आली डिजल इंजिन लाईट इंजिन फिरता चरक एखादा माणूस किंवा बाई चालवत असते मिनी रिक्षावाले चरक घेऊन वाटचाल करत आहे
असे सर्व काही असले तरी बैल लाकडी चरक आणि ऊसाच्या रसाचा आस्वाद वेगळाच
आरामशीर फिरतं केलेल रसपान पेक्षा भर ऊन्हात प्रवासात केलेलं रसपान जीवाला थंडावा देतयात शंकाच नाही म्हणूनच खौट बोलणारी माणसं असताना रसवंती धारण करून माणसं जपणारी माणसे खरच आपली वाटतात
असो कालाय तस्मै नमः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *