कोपरगाव सोसायटीच्या(एम.पी) चेअरमनपदी वैभवराव आढाव तर व्हाइस चेअरमन पदी दत्तात्रय सावंत…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यात सुमारे ७२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध संपन्न झाली आहे.यात चेअरमनपदी वैभवराव आढाव तर व्हाइस चेअरमन पदी दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात सन १९५० पासून कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यरत आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना पिक कर्ज,शेती उपयुक्त नामांकित खत कंपन्यांची विक्री व्यवस्था,इंडियन ऑईल कंपनीचा पेट्रोल,डिझेल आणि ऑईल विक्रीचा पंप आहे.वाहनांच्या इंजिनची निगा राखण्यासाठी एक्स.पी.९५ या प्रकारचे पर्यावरणपुरक पेट्रोल विक्री सेवा आहे.इंडियन ऑईलचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे "सर्वो" ऑईल उपलब्ध आहे.पंपावर ग्राहकांना थेट ऑनलाईन द्वारे पैसे स्विकारण्यासाठी आधुनिक प्रणाली आहे,याचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांना मिळत आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या जन धन योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकाने सन्मान झालेली महाराष्ट्र राज्यातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे.

      कोपरगाव सोसायटीच्या नव्याने झालेल्या सन २०२२ ते २०२७ या कार्यकालाच्या संचालक निवडीची सर्व प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे.त्यानंतर संचालक मंडळातून चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवड करण्यात आली आहे.

यात चेअरमनपदी वैभवराव शंकरराव आढाव, व्हाइस चेअरमनपदी दत्तात्रय रामभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे.संचालक मंडळात चंद्रकांत सहादू आढाव, पोपटराव कोंडाजी नरोडे,महेंद्र बाबुराव पाटील,प्रविण शंकरराव शिंदे,केशवराव रंगनाथ साबळे, चंद्रशेखर छबुराव आव्हाड, रामनाथ सुभाष शिंदे,संजय पाराजी वडांगळे,सौ.शैलजा अंबादास आढाव,सौ.चित्रा विश्वासराव महाले यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार करण्यात निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.क्षीरसागर, सहाय्यक एस.पटेल यांचे सह सोसायटीचे सचिव बी.आर.येवले, संजय नळे,नंदकुमार भोसले यांचे सहकार्य लाभले.नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *