

कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
विजय मित्र मंडळ फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेली भिमजयंती अतिउत्साहात
साजरी करण्यात आली व अन्नदान करण्यात आले


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवंदना करण्यासाठी
औद्योगिक वसाहत चे चेअरमन व जिल्हा सहकारी बँक संचालक
श्री.विवेक भैय्या कोल्हे साहेब व
कोपरगाव चे पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव देसले साहेब
हे आले होते.यांच्या उपस्थितीने
कार्यक्रमाच्या आणखीन शोभा वाढवली गेली
विजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
माननीय श्री.विवेक भैया कोल्हे साहेब
व पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव देसले साहेब शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंच
श्री.भीमा संवत्सरकर, शिर्डी पोलीस श्री.आनंद पगारे
व श्री.सुनील शिंदे यांचे आभार मानले


व श्री. विवेक भिय्या कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय जाधव यांचे कार्याचे कौतुक केले .
तसेच पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य बद्दल माहिती दिली.
व या सर्व मान्यवरांचे
विजय जाधव मित्र मंडळ फाउंडेशन तर्फे आनंद पगारे, संतोष पगारे, सतीश जाधव यांनी सत्कार केला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी
सर्वात मोलाचे योगदान शिंगणापूर सरपंच श्री.भीमा संवत्सरकर
तसेच योगेश कोळगे,अनिल भिंगारदिवे ,सागर भालेराव ,अजय उगले
यांचे लाभली .
व सर्व मान्यवरांचे आभार
श्री सतीश रमेश जाधव यांनी मानले.
