“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
विद्यमान परिस्थितीत जातीयवादी शक्ती प्रबळ ठरत असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेला सन्मानाने जगणे अवघड झाले असून त्या वर मात करायची असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या राज्य घटनेतून समता, स्वातंत्र्य,बंधुता व सामाजिक न्याय या चतुसूत्रीने सर्व सामान्य माणसाला निर्धोक पणे जगण्याचे हक्क बहाल केले राज्य घटनेत धर्म निरपेक्षता सांगितली असली तरी कोणत्याच धर्माला व धार्मिक विचाराला निर्बंध घातले नाही असे असले तरी दुर्दैवाने सद्या राजकीय फायद्यासाठी जातीय व धार्मिक वाद निर्माण करण्याचे काम सुरू असून त्यामुळे एकसंघ देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले जगणे मुस्किल झाले असून या देशाची राष्ट्रीय एकात्मता टीकवायची असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे
या वेळी दिलीप तूपसुंदर सर बाळासाहेब पवार, निसार शेख,अकबर शेख,अँड.सोनल पोळ आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *