भगवान महावीरांची शिकवण प्रेरणा देणारी:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण देत मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगांव सकल जैन समाजाच्यावतीने शहरात महावीर जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी निघालेल्या मिरवणूकीत विवेक कोल्हे यांनी सहभाग घेत जैन समाजाच्यावतीने हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक करत त्यांना पाठबळ दिले. शहराच्या मध्यवस्तीत जैन समाजाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे त्यांनी उद्घाटन केले.
याप्रसंगी अतुल काले, सी डी ठोळे, महावीर काले, महावीर दगडे, अमित जैन, मुनिष ठोळे, सचिन अजमेरे, भाजपाचे गटनेते रविंद्र पाठक, स्वप्नील निखाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, अशोक पापडीवाल, रविंद्र ठोळे, संतोष गंगवाल, अनिल कासलीवाल, संजय पाटणी, विशाल बडजाते, रविंद्र लोहाडे, मुन्ना पाटणी, रेखाताई काले, नितीन कासलीवाल, पंकज गंगवाल, यश काले, चंद्रकांत कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल यांच्यासह जैन समाजातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, जैन समाजाचे २४ वे तीर्थकर म्हणून भगवान महावीरांची प्रतिमा संपुर्ण विश्वात उच्च कोटीची आहे. जयंती उत्सवातुन भगवान महाविरांच्या विचारांचे स्मरण ठेवणे आणि त्यांच्या विचारांना उजळणी देणे हा उददेश सर्वांनी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले, शेवटी अतुल काले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *