
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर या ठिकाणी दिंनाक १७ एप्रिल २०२२ रोजी म्हसोबा देवाची यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शिगणापुर येथे ग्रामसभेत यात्रेचा निर्णय झाला असुन ग्रामसभेत एकमताने भिमराव संवसरकर यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हि यात्रा होणार आहे.

या यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिंनाक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.रविवार दि १७ एप्रिल रोजी म्हसोबा देवाची जंगी यात्रा असुन सकाळी ७वा कावडीची मिरवणूक,आणि श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थ प्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे.दुपारी ४ वाजता पालखी मिरणुक होवुन रात्रि संगीता महाडिक यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.१८ एप्रिल रोजी कुस्त्यांचा जंगी हंगामा कार्यक्रम संपन्न होणार असुन या कार्यक्रमासाठी भाविकांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे

असे आवाहन अध्यक्ष भिमा संवत्सरकर सेक्रेटरी श्रीकांत संवत्सरकर अंकुश कुऱ्हे हिरालाल संवत्सरकर जालीदर संवत्सरकर अनंतराव संवत्सरकर योगेश संवत्सरकर दिनकर गिते यशवंत संवत्सरकर सुनिल कुऱ्हे प्रमोद संवत्सरकर नाना कुऱ्हे अविनाश संवत्सरकर ज्ञानेश्वर संवत्सरकर विजय संवत्सरकर आशिश संवत्सरकर शेखर कुऱ्हे शिवा आजगे किरण धोक्रट कैलास कुऱ्हे बाळु चोरघे बाबासाहेब कुऱ्हे राहुल आढाव रुपेश आजगे विशाल कुऱ्हे समाधान कुऱ्हे अविनाश लगड सुनिल भोसले पंकज कुऱ्हे भाऊसाहेब संवत्सरकर गौतम त्रिभुवन आकाश गायकवाड देविदास जऱ्हाड समस्त गावकरी
श्री म्हसोबा देवस्थान उत्सव कमिटीच्या वतिने करण्यात आले आहे.
