
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत कोपरगाव मतदार संघातील ९ गावातील १४ रस्त्यांसाठी ९१ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
या निधीतून मतदार संघातील भोजडे येथील गावठाण मंचरे धनगर गल्ली रस्ता काँक्रीटिकरण करणे (५ लाख), डाऊच खुर्द बढे वस्ती रस्ता काँक्रीटिकरण करणे (४ लाख), कोळपेवाडी खळवाडी रस्ता काँक्रीटिकरण करणे (१० लाख), कोळपेवाडी बिरोबानगर येथे रस्ता कॉंक्रीटिकरण करणे (१० लाख) व महेश्वरनगर येथे रस्ता कॉंक्रीटिकरण करणे (१० लाख), जेऊर पाटोदा घरकुल वसाहत गावठाण रस्ता (४ लाख) तसेच आव्हाड वस्ती (६ लाख) व सानप कुदळे वस्तीपासून बाचकर वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण व कॉंक्रीटिकरण (६ लाख) आणि केकाण वस्ती रस्ता कॉंक्रीटिकरण करणे (४ लाख), जेऊर कुंभारी येथे आव्हाड वस्ती ते मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता करणे (१० लाख), डाऊच बुद्रुक बढे वस्ती रस्ता खडीकरण व कॉंक्रीटिकरण करणे (३ लाख), धामोरी कोळपे वस्ती रस्ता खडीकरण व कॉंक्रीटिकरण करणे (४.५० लाख), बक्तरपूर नवीन गावठाण बक्तरपूर पश्चिम रस्ता कॉंक्रीटिकरण करणे (१० लाख), कारवाडी आव्हाड वस्ती मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता खडीकरण व कॉंक्रीटिकरण करणे (५लाख) असा एकूण ९१.५० लाख रुपये ९ गावातील १४ रस्त्यांसाठी मिळाला आहे. इतरही रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले असून निधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.विश्वजित कदम यांचे आभार मानले आहे.
