
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर बाबाराजे विचार मंचच्या वतीने आमचे माळकरी मामा जे कलियुगाचे श्रावण बाळ यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करून व आपल्या आईला खांद्यावर घेऊन साईबाबांचे दर्शन केले . आईंचे वय एकशे पाच वर्ष तर मुलाचे वय आहे एकाहत्तर वर्ष आहे. अशा या मातृ भक्ताच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल बाबाराजे विचार मंच कोपरगाव यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला


याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व कोपरगाव शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


यामध्ये सर्वस्वी बाबाराजे देशमुख विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन राव मोरे तसेच लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव आहिरे हे प्रामुख्याने उपस्थित होते
