श्रावणबाळ बबनराव जोगदंड यांचा आजच्या तरुण पिढीने घ्यावा आदर्श:-जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील वारकरी असलेले रिक्षाचालक बबन तुळशीराम जोगदंड यांनी त्यांच्या वयाच्या ७१वर्षी आपल्या १०५ वर्षाच्या आईला जयाबाईला खांद्यावर घेत कोपरगाव ते शिर्डी श्री साईबाबांची यात्रा घडवली या निमित्ताने शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल ,कोपरगाव तालुका अँटो रिक्षा पतसंस्थेचे चेअरमन पत्रकार राजेंद्र सालकर युवानेते विक्रांत झावरे,प्रवक्ते राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बबनराव जोगदंड व त्यांची आई जयाबाईचा सत्कार करण्यात आला आहे

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की,रिक्षाचालक माळकरी बबनराव जोगदंड यांनी आपल्या आईला कोपरगाव ते शिर्डी खांद्यावर घेत पदयात्रा केली त्यांचा आम्हाला व आमच्या रिक्षा युनियनला आदर्श आहे जोगदंड हे माळकरी असुन माळकरीला साजेसे असे काम त्यांनी केले आहे. आजकाल आई बापाला कोणी सांभाळत नाही आमचे रिक्षाचालक असलेले जोगदंड यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा. याप्रसंगी रिक्षा अँटो पतसंस्थाचे मँनेजर ज्ञानेश्वर सिनगर, शिवसेना सचिव बाळासाहेब सांळुके, उपशहर प्रमुख शेखर कोलते, विकास शर्मा, श्रीपाद भसाळे,राहुल हसवाल,अनिल नवगिरे,अँडव्होकेट यादव साहेब,उमेश छुगाणी, नरेंद्र बैरागी आदि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *