केंद्र शासनाचे इथेनॉल कर्ज वाटप मुदतवाढीचे धोरण स्वागतार्ह मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे, महाराष्ट्र महिला प्रदेश सरचिटणीस, भा.ज.पा…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
दि.५ एप्रिल २०२२ रोजीच्या केंद्र शासनाच्या राजपत्रानुसार केंद्र शासनाने इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (EBP) यशस्वीरित्या राबविण्यासाठी व साखर कारखान्याची लिक्विडीटी पोजीशन सुधारून देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेत अदा करणेसाठी विविध योजना काढल्या असून त्यापैकी इंटरेस्ट सबव्हेन्शन स्किम अंतर्गत इथेनॉल प्रोजेक्टसाठी कर्ज वितरणाची मुदत मार्च २०२२ अखेर होती. सदरची मुदत मिनिस्ट्री ऑफ कन्झुमर अॅफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ फूड अॅण्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, कृषी भवन, नवी दिल्ली यांनी दि. ०६/०४/२०२२ रोजीचे राजपत्रान्वये वाढवून सदर स्किमची अंतिम मुदत दि.३०/०९/२०२२ अशी केली आहे. याबद्दल देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी व सहकार मंत्री मा.ना.अमितजी शहा तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप एस.पुरी व केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करून सदरचा निर्णय देशातील सहकारी कारखानदारीला पोषक व स्वागतार्ह असल्याचे मत मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पास मंजूर केलेल्या कर्ज वाटपासाठी दि.३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिल्याने अतिरिक्त साखरेच्या समस्येवरील उपाय आणि पेट्रोल-डिझेलच्या आयातीवरील अवलंबीत्व कमी करण्याचे दृष्टीने केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचं लक्ष ठेवले आहे. तसेच या योजनेअंतर्गत किमान ६% किंवा व्याज दराच्या ५०% यातील जी कमी रक्कम असेल ती रक्कम केंद्र सरकार व्याज अनुदानाच्या स्वरूपात सदर प्रकल्पाला देणार असून केंद्र शासनाचा हा निर्णय समाधानकारक व धाडसी असल्याचे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे लवकरच ग्रामीण भागात इथेनॉल पंपांची उभारणी होणार असून नवीन वाहनांना मल्टीफ्युएल फ्लेक्स इंजिन किट बाजारात उपलब्ध होताच ऑईल कंपन्यांशी चर्चा करून अशा प्रकारचे इथेनॉल पंप लवकरच उभे राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *