साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील भिष्म पितामह हरपला:-ज. भा.भड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि साखर उद्योग हे एक मिळतं जुळतं समिकरण असुन त्यांच्या ठायी साखर उद्योग, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा आवाका प्रचंड होता त्यांच्या निधनाने साखर क्षेत्रातील भिष्म पितामह हरपला अशा शब्दात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोएिशन (इंडिया) पुणे या संस्थेचे प्रभारी अध्यक्ष ज. भा. भड यांनी शोक व्यक्त केला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला पाठविलेल्या शोकसंदेशात या संस्थेचे उपाध्यक्ष सोहन शं. शिरगांवकर (कर्नाटक), तांत्रिक विभागाचे उपाध्यक्ष विक्रमसिंग पु. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, कै. कोल्हे यांचा सरपंच ते देशपातळीवरील नॅशनल फेडरेशन शुगर को. ऑप. संस्था नविदिल्ली पर्यंतचा प्रवास ध्यासपूर्ण असून बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगातील संक्रमण अवस्था लक्षात घेवुन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या कारखान्यांबरोबरच इतरांना सांगितलेल्या उपाययोजना अतिशय उदबोधक असून व्यासंगी विचाराच्या जोरावर सहकाराच्या माध्यमांतुन उभा राहिलेला साखर उद्योग टिकला पाहिजे आणि त्यावर अवलंबुन असणारी अर्थव्यवस्था चालली पाहिजे हे नेमकेपणांने शंकरराव कोल्हे यांनी हेरले, विकसीत देशातील साखर उद्योग क्षेत्राला भेटी देवुन त्यातून आत्मसात केलेले ज्ञान भारत देशातील साखर कारखानदारीला देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या या ज्ञानाचा गौरव म्हणून डेक्क्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनने त्यांना ३ ऑगस्ट २०१४ रोजी गुजराथ राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान केला होता, असे अभ्यासू व्यक्तीमत्व आपल्यातून हरपले आहे. त्यांच्या जाण्याने साखर उद्योग पोरका झाला आहे, त्यांच्या कार्याला नतमस्तक होवुन डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन व राज्यातील सर्व सभासद, डेक्कन परिवार कोल्हे कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *