
कोपरगाव प्रतिनिधी:-
फोन वाजला… नंबर सेव्ह नव्हता,.. मी फोन घेतला,..समोरून ” हॅलो..भरत मोरे बोलता का, तुम्ही घरी आहे का,..? ” मी “हो ” म्हणालो ,…पण काय काम आहे ,कोण बोलत आहे,..मी विचारलं ,. समोरून ..” मी कोल्हे साहेब यांचा पि ए बोलतो आहे,साहेब स्वताहा तुमच्या घरी येणार आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभ आशिर्वाद देण्यासाठी..” ….बाप रे , दस्तुरखुद्द स्वतःहा साहेब , माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरी येणार,त्यात मी विरोधी पार्टीचा शिवसेनेचा शिवसैनिक,काही क्षण तर माझा माझ्यावरच विश्वास बसेना,..मित्रांना फोन केला मित्रही आनंदात माझ्या घरी घाईनं पोहचले,…पत्नी सौ.सपनाने पटपटा घर आवरले,…
२९/९/२०१४ रोजीची सकाळ,..दहा वाजले होते,ज्या महापुरुषाला दुरून पाहूनही आनंद वाटायचा,..आज ते महापुरुष माझ्या घरी येणार,जसा देव माझ्या घरी येणार होता,ईतकी खुशी मला ,माझ्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला झाली..
साहेब घरात आले,आम्ही घरात जमलेले सर्व साहेबांच्या पाया पडलो, साहेब खुर्चीत बसले, साहेबांनी माझ्या आईचे वडील पढेगांवचे निवृत्तीबाबा शिंदे,माझे वडील यांच्या आठवणी काढत बोलणे सुरू केले,..पण मी स्वप्नात तर नाही ना, म्हणून क्षणाक्षणाला स्वताहालाच बारीक चिमटे घेत होतो,…साहेबांच बोलणं, तो रूबाबदार चेहरा, पण तेवढीच चेह-यावर मायेची छटा उमटत साहेबांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वताहा मला ओवाळले आणि कपाळी गंधाचा टिळा लावत आशिर्वादही दिले..……मी पुन्हा पाया पडलो,त्या क्षणाचे फोटो या सदरील लेखाबरोबर मी पोस्ट करत आहे,….कोपरगाव तालुका हा महाराष्ट्रात काळे आणि कोल्हे यांच्यातील राजकारणापेक्षा त्यांनी शेतकरी हितासाठी जपलेले साखर कारखाने महाराष्ट्रात किती सर्वोत्तम आहेत यासाठी तालुक्याची ख्याती जगभर आहे,… दोन्ही कारखाने मिळून हजारो मजुर कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो आणि याच हजारो मजुरांच्या जिवावर कोपरगाव शहराच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीला हातभार लागतो…. म्हणून,..कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब हे तालुका जपणारे, अबाधित ठेवणारे खरे योध्दे होते आणि आहे.. आज तालुक्यातील कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता मोठा होणं असो, सामाजिक कार्यकर्ता मोठा होणं असो,..वा मोठा नेता झालेला असो ,…या दोन महापुरूषांनीच यांना घडवलेले आहे,आणि काहींना मार्गदर्शनाच्या स्पर्शाने घडवले आहे,..असं मला वाटतं….
..पण आजची सकाळ ही वेदनादायक ठरली..
…..,दिनांक १६/३/२०२२ ,..वेळ सकाळी ९:४५ ची,…तिनं चहा पुढं केला ,…आणि टिवीतून कोल्हे साहेब गेल्याची बातमी कानात घुसली आणि बातमी ह्रदयापर्यंत येत धस्स असं झालं,…आपोआप माझं शरीर खुर्चीतून उभं राहीलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या…या तालुक्याचा कैवारी गेला,खंडकरी शेतक-यांसाठी लढणारा खरा सत्याग्रही नेता गेला, कोपरगावचा भाग्यविधाता गेला, कोपरगावच्या वैभवाला दृष्ट लागली,आजची सकाळ ही तालुक्यासाठी काळी सकाळ ठरली,..खंडकरी शेतक-यांचा,सामान्यांचा देवच वैकुंठाला गेला की काय..…अश्या पितृतुल्य भावनांचा उच्छाद मेंदूत कहर माजवू लागला,…कारण काही भकास तालुके पाहीले तर ..,किंवा काही तालुक्यांत आजही कितीतरी मैलांवरून चार चार हांडे आमच्या मायभगिनींच्या डोक्यावर वाहतांना आम्ही पाहतो ,..तर आपण त्यांच्यापेक्षा आपल्या कोपरगाव तालुक्यात खुप सुखी आहे,असं अभिमाननं जे वाटत ना,.. ते फक्त या दोन महापुरूषांमुळेच….आज दिवसभर सोशलमिडीया वर साहेबांच्या नानाविवीध प्रतिमा येवू लागल्या, श्रध्दांजली, आदरांजली तर कोणी शब्द सुमनांनी आपल्या भावना प्रेमापोटी तोडक्या मोडक्या का होईना व्यक्त होवू लागले, संपुर्ण कोपरगाव तालुका व शहरावर शोककळा पसरली, शहरातील कुटूंबांनी,..तरूण मंडळांनी उद्याचा वर्षातला मोठा सण होळी साजरी करण्याच्या तयारीला पुर्णविराम दिला…शहरात सगळीकडे सुतकी शांतता पसरली……साहेबांच्या सहवासात आलेल्यांच्या माथी जणू दुःखाचा एव्हरेस्टचं कोसळला.. जशी बुलेट ट्रेन धावते ,..तशी साहेब स्वर्गवासी झाले हि बातमी झपाट्यानं महाराष्ट्रभर काही क्षणांतच पोहचली,…..
शिवसेनेचे अस्लमभाई शेख, मी आणि गगन भैय्या हाडा आम्ही अंत्यसंस्कार विधीला इंजिनिअरिंग काॅलेजच्या मैदानात हजारोंच्या शोकाकूल समुदायात सामिल झालो,…विधीवत कार्यक्रम सुरू असतांना आम्ही साहेबांनकडे काही कामानिमित्त गेलो त्यावेळीच्या आठवणींना उजाळा मिळाला,…एखादी न संपणारी सिनेमाच्या कथेतील नायकाच्या भूमिकेचा जीवनपट जसा साहेबांनी खंडकरी शेतक-यांसाठी, ईतर शेतक-यांच्या हक्कासाठी,आणि सामान्य जनतेसाठी केलेल्या संघर्षाचा कर्तृत्वाचा एक एक पटकथेतील मला माहीत असलेले दुश्य उघड्या डोळ्यांच्या पडद्यावर झपझप येवून जाऊ लागले,.. नगर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक मंत्री,मा.मंत्री,बडे नेते आदरयुक्त आदरांजली वाहत होते,…आणि अग्नीच्या साक्षीने साहेब अनंतात विलीन होत होते..तसतसं उपस्थितीतांच काळीज आपल्या योध्दा नेत्यासाठी अश्रू ढाळत होते,..हे मी पाहत होतो..,
कोणतही नैसर्गिक,आस्मानी संकट आलं तर ,..उदा- महापुर असो,कोरोना असो ,..यासारख्या संकटात दोन्हीही साखर कारखाने रयतेच्या मदतीला धावून येतात,..औषधांपासून ते पोटाच्या खळगीत भर टाकेपर्यंत देवासारखी मदत करतात,..आणि हाच वारसा काळे कोल्हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवला आहे आणि कदाचीत यामुळेच कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक कुठलही संकट येवो,..शेवटाला आपली जबाबदारी घेणारे दोन्ही साखर कारखाने आहे या भरोश्यावर रोज रात्री निर्धास्तपणे साखरझोप घेतात,..ती फक्त कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या कार्यामुळेच..
साहेब अमर रहे.
शोकाकुल…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युवामंच
हत्ती गणपती
मा.नगरसेविका सौ सपना भरत मोरे प्र.नं.३
उत्तरनगर शिवसेना महिला आघाडी
काशिबाई फिल्म्स प्रोडाक्शन
प्रगती आयुर कंपनी
प्रगती मेडीकल आणि चष्माघर
शब्द.
भरत मोरे
९५५२२२५५२८
