गाडीला धडक दिल्या कारणावरून वाद;कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे नागरे पेट्रोल पंपा समोर तुमच्या पाहुण्याने गाडीला धडक दिल्याचा जाब विचारण्यावरून गुरुवार दि.२१ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास दोन गटात वाद निर्माण झाला.या प्रकरणी शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी भाऊसाहेब मोतीराम भाबड,यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत फिर्यादी भाऊसाहेब मोतीराम भाबड व सलीम पठाण हे दोघे जखमी झाले आहे.
सतीश रमेश केकान,सुनील पुंजाजी केकान, संकेत सुनील केकान,किरण रमेश केकान,संदेश मचीन्द्र केकाण,निखील चंद्रकांत पिंगळे सर्व.रा.जेऊर पाटोदा यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गु.रजि.३५/२०२१ भादवी कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९,५०६,५०४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपीना अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.आर. पी. पुंड हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *