
जागतिक महिला दिन
कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचा उपक्रम…
कोपरगाव प्रतिनीधी:- महिलांचे समाजाचे जडणघडणीत पुरुषांईतकेच भरीव योगदान असून महिलांचा सदैव आदर राखला जाईल या विचाराने काम करुया.असे आवाहन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचे सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.मंगला राजेभोसले,

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगीता मालकर, नेत्ररोग तज्ञ डॉ.तेजश्री नाईकवाडे,न.पा.उर्दु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शबनम शेख, सूर्यतेज संस्थेच्या रश्मीताई जोशी, लायन्स क्लबच्या डॉ.सौ.दिपाली आचार्य,कोपरगांव न्यायालयाच्या ॲङ श्रध्दा जवाद ,ॲड.ज्योती भुसे,गटशिक्षण अधिकारी सौ.शबाना शेख

महिला दिना निमित्ताने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा तात्पुरता पदभार न.पा.उर्दु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शबनम शेख,


तर ठाणे अंमलदार पदाचा तात्पुरता पदभार दक्षता समितीच्या महीला श्रीमती वैशाली आढाव यांना देण्यात आला.त्यांना सन्मानाने खुर्चिवर बसविण्यात आले.काही वेळ त्यांनी कामकाज पाहिले.हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त करतांना कोपरगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अपेक्षा व्यक्त केली त्यास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन मार्फत प्रतिबंधात्मक करत असलेल्या कारवाई संदर्भात माहिती दिली.
प्रसिद्ध फेटेवाले वैशाली आढाव यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची महिलांविषयी संवेदना लक्षात घेऊन त्यांना नाविन्यपूर्ण फेटा बांधून महिलाही सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचा संदेश देत महिला दिनाचे उपक्रमाबद्दल आभार मानले.तसेच कु.शालू नावाच्या शालेय विद्यार्थ्यांनीला पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी महिला दिनानिमित्त बोलण्यास प्रवृत्त करुन वकृत्व शैलीचे धडे दिले.श्री.देसले यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे या चिमुलीने सहजपणे मांडलेल्या भावना उपस्थितांची दाद देवून गेल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले तर आभार गोपनीय शाखेचे राम खारतोडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने,दिलीप तिकोने,साठे, सचिन अनर्थे,प्रमोद येवले सह कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मानाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करुन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस कर्मचारी यांना आभार व्यक्त केले.
