
कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रतिनिधी देवळाली प्रवरा : मुसळवाडी ता.राहुरी येथील तरुणाने कोपरगाव येथील महिला नायब तहसिलदार यांच्या मुलास महावितरण विज कंपणीत कारकुणाची नोकरी लावून देतो.महिला नायब तहसिलदार यांच्याकडून एक लाख ३२ हजार घेवून गंडा घातला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यात राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तरुण नितीन शहाजी धुमाळ याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोपरगाव पोलिस ठाणे अंमलदार यांच्या कडून समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मनिषा प्रभाकर कुलकर्णी (४४) धंदा, नोकरी रा. गुलमोहोरकॉलनी, इंदिरापथ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील नितीन शहाजी धुमाळ याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत सांगितले की, माझा विश्वास संपादन करून महावितरण विज कंपणीत तुमच्या मुलास कारकुणाची नोकरी लावून देतो त्यासाठी तुम्हाला बक्षिस म्हणून काही रक्कम द्यावी लागेल धुमाळ याने नायब तहसिलदार यांच्या कडून एक लाख ३२ हजार रुपये घेवून आज उद्या नोकरीस लावतो असे सांगुन फसवणूक केली आहे. नायब तहसिलदार मनिषा प्रभाकर कुलकर्णी यांचा मुलगा नोकरीच्या शोधात होता. नोकरीची जाहिरात वाचून नगर येथे महावितरण विज कंपणीच्या कार्यालयात गेला असता तेथे राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील नितीन शहाजी धुमाळ हा तरुण भेटला व त्याने माझ्या मुलाचा विश्वास संपादन करुन माझी भेट घेतली तुमच्या मुलास कारकुणाची नोकरी लावून देतो.त्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, सुरवातीला दीड लाख व नंतर राहिलेले दीड लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्याने माझ्याकडे केली. विश्वास संपादन करुन मुलास नोकरी लावण्याचे अमिष दाखवुन एप्रिल २०१८ ते जुन २०१८ रोजी पर्यंत वारंवार त्याने गोड बोलुन माझ्याकडुन १,३२०००/- रु रक्कम त्याच्या स्वतःचे महावितरण विज कंपणीच्या अहमदनगर कार्यालयात तसेच अहमदनगर येथील अंँक्सीस बॅकेतील नितीन धुमाळ याच्या खात्यात जमा करुन घेवुन माझी फसवणुक केली आहे.
फसवणूक झालेल्या पिडीत मुलाच्या आई तथा नायब तहसिलदार मनिषा प्रभाकर कुलकर्णी यांनी गुरवारी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. आर. पी. पुंड हे पुढील तपास करीत आहेत.
