रुग्णवाढ नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा:- जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना संसर्ग रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रुग्णवाढ नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा.अशा सुचना
जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या.

कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी अजित फरगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्याचिकित्सक डॉ.संजीव बेळंबे यांनी कोपरगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी विशेष दौरा केला.त्यांनी कोपरगाव
शहरातील

एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील कोरोना केअर सेंटर,

ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे भेट दिली.
तेथील व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
तसेच कोविड संसर्ग नियंत्रण संदर्भात विविध खातेनिहाय सुचना केल्या.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे, कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर,शहरी आरोग्य केंद्राचे डॉ.गायत्री कांडेकर,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विनया ढाकणे, डॉ.रेणु नागरे, डॉ.अक्षय गायकवाड यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी,न.पा.कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी संस्थात्मक विलगीकरण,रुग्णांचे संपर्क शोधून त्यांची कोरोना चाचणी घेणे,नागरिकांनी मास्क वापरणे संदर्भात पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत दंडात्मक कारवाई आणि नागरिकांमध्ये जनजागृती संदर्भात सुचना केल्या.

नागरिकांनीही कोरोना साथ नियंत्रणासाठी नियमितपणे मास्क वापरणे,हात वेळोवेळी धुणे, सामाजिक अंतर राखणे,कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार चाचणी करुन औषधोपचार सुरू करणे संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *