
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतरत्न ग्रामसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज दु:खद निधन झालं. अतिशय दु:ख झाल. भारतीय संगीत सृष्टी अजरामर करणाऱ्या लता दीदी यांच्या निधनाने दैवी स्वर आज कायमचा हरपला आहे. लता दिदींनी आपल्या दैवी सुरांतून केवळ देशात नव्हे तर जगभरातील रसिकांना भुरळ घातली होती. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबीय तसेच देशभरातील नागरिकांवर दुखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
समीर भुजबळ,माजी खासदार.
