कोपरगाव शहर पोलिसांनी आयुर्वेदिक औषध विक्रीत्याला लुटणाऱ्या दोघा आरोपींना केले जेरबंद…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलिसांनी आयुर्वेदिक औषध विक्रीत्याला लुटणाऱ्या दोघा आरोपींना केले जेरबंद
कोपरगाव शहरातील येवला नाका येथे दोघांनी आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला अडवून जबर मारहाण केली. तसेच ४०० रुपये रोख व २५ हजार रुपयांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी (ता.२९) रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास घडला आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ आपले नेटर्वक फिरवून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार इदलुसा रामलू पॅरला हे आयुर्वेदिक औषध विक्रेते येवला नाका परिसरात होते. त्याचवेळी राहुल चव्हाण (रा.करंजी) व तुकाराम भरम भोसले (रा.पढेगाव) या दोघा आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्याकडून ४०० रुपये रोख व २५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच-०१-८१९२) ही हिरो होंडा कंपनीची गाडी बळजबरीने लुटून घेवुन गेले. या प्रकरणी शहर पोलिसांत इदलुसा पॅरला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुरनं.२१/२०२२ भादंवि कलम ३९४, ३४१, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व उपनिरीक्षक ठोंबरे यांच्या नेटर्वक मुळे तत्काळ सूत्रे फिरवुन वरील दोघा आरोपीन पैकी आरोपी राहुल चव्हाण यास रात्री ११.०० वाजता अटक केली तर दुसरा आरोपी तुकाराम भोसले यास पहाटेच्या सुमारास मुसक्या आवळत गजाआड केले. ह्या घटनेचा तपास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *