ढाकणे परिवाराने कोपरगावचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले:- माजी नगराध्यक्ष वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगाव शहरातील ढाकणे परिवार हा कोपरगावचा अभिमान असून संपूर्ण परिवाराने आपल्या माध्यमातून कोपरगाव चे नाव जागतिक स्तरावर नेले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व माजी खासदार कै सूर्यभान पाटील वहाडणे ट्रस्ट चे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ढाकणे परिवाराच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केली.
सविस्तर वृत्त असे की नुकतेच कोपरगाव शहरातील स्वच्छता दूत व गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांना ते करत असलेल्या गोदावरी नदी स्वच्छतेच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सामाजिक अभियांत्रिक पुरस्कार मिळाला म्हणून तर त्यांचा मुलगा प्रज्वल आदिनाथ ढाकणे यास आंतर विद्यापीठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल तसेच खेलो इंडिया खेलो साठी निवड झाल्याबद्दल व कुमारी वैष्णवी आदिनाथ ढाकणे योगा नॅशनल झाल्याबद्दल माजी खासदार कै.सूर्यभान पाटील वहाडणे ट्रस्टच्या वतीने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ढाकणे परिवाराचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देत सन्मान केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *