


कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दिनांक,०९/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा व दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड वाटप तसेच रेल्वे पास चे वाटप करण्यात आले हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या प्रयत्नातून आमचे नेते अहमदनगर जिल्ह्याची बुलंद तोफ उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे मनसे उप जिल्हा अध्यक्ष श्री संतोष भाऊ गंगवाल यांच्या शुभहस्ते तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील जवळपास 40 दिव्यांगांना अंतोदय रेशन कार्ड 20 दिव्यांगांना अन्नसुरक्षा रेशन कार्ड 40 दिव्यांगांना दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड तसेच पाच दिव्यांगांना रेल्वे कन्सेशन पास वाटप करण्यात आले दिव्यांग बंधू-भगिनींना वरील रेशन कार्ड मिळण्यासाठी माझी तहसीलदार सन्माननीय श्री योगेशजी चंद्रे आत्ताचे तहसीलदार श्री विजय जी बोरुडे साहेब मंडल अधिकारी तथा पुरवठा विभागाचे श्री भिंगार दिवे साहेब श्री बिनोड साहेब नायब तहसीलदार कुलकर्णी मॅडम श्री गायकवाड साहेब श्री रवि काळणे श्री प्रवीण काजळे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने वरील सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले तसेच याप्रसंगी श्री रोशन खकाळे यांची मनसे दिव्यांग सेना अहमदनगर उत्तर उपजिल्हा अध्यक्षपदी श्री भाऊसाहेब पारखे यांची कोपरगाव तालुका अध्यक्षपदी तर अर्चना ताई बनकर यांची कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली याप्रसंगी मनसे दिव्यांग सेना तालुका संघटक संजय गीते महिला शहराध्यक्ष संगीताताई रावळ अनिल मामा गिड्डे पाटील साहेब अनिल भाऊ वाणि गणेश गायकवाड गौरव आमले अमोल डांगे योगेश खरोटे आदी मान्यवरांसह लाभार्थी दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपणास दिव्यांग लाभार्थी योजने अंतर्गत अंत्योदय व अन्नसुरक्षा रेशन कार्ड मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तसेच श्री अनिल भाऊ गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
