डिजीटल क्षेत्रात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा सोबत दमदार पाउल:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजीटलायझेशन क्रांती यशस्वी करून सर्वांच्या उत्कर्षासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले असुन त्याचाच एक भाग म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि महिंद्रा कृष- ई कंपनीच्या संयुक्त विद्यमाने थेट उपग्रहाद्वारे उस शेती पिकाचे सर्वेक्षण आणि शेतक-यांना पीक वाढीसाठी थेट बांधावर मौलिक सल्ला देणा-या तंत्रज्ञान प्रणालीचा शुभारंभ अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते झाला. सहकारी साखर कारखानदारीत सर्वप्रथम उस लागवडीपासुन ते कापणीपर्यंतचा कालबध्द पथदर्शी प्रकल्प घेवुन त्याचा लौकीक देशपातळीवर वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अशिष गणपुले व राज्यप्रमुख मंदार गडगे यांनी महिंद्रा कृष- ई तंत्रज्ञान पीक सल्ला उपग्रह जोड, हवामान आधारीत पीक सिंचन व किड नियंत्रण, शेतीच्या हवामानानुसार वैयक्तीक पीक सल्ला, जमिनीच्या प्रकारानुसार पीक नियोजन, माती व पाणी परिक्षण आधारीत खतांच्या योग्य मात्रा, उसाचे एकरी १०० मे टनापर्यंत वाढ उददीष्ट आदिबाबत माहिती दिली.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी विविध योजना अंमलात आणल्या. उस उत्पादक सभासद शेतक-यांची पीक उत्पादकता वाढावी, एकरी उसाचे उत्पादन वाढुन साखर उतारा सर्वाधिक मिळावा, विकसीत देशातील शेतीचे तंत्र आपल्या शेतकरी बांधवांना मिळावे या उददेशाने तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याशी थेट संपर्क साधुन याबाबतचा अभ्यास करत त्याबाबतचे नियोजन कारखाना कार्यक्षेत्रात सुरू करत थेट उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करणारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना देशपातळीवरील सर्वप्रथम ठरला असुन यामाध्यमातुन वैचारिक देवाण घेवाण होवुन त्याचा प्रत्यक्ष ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना फायदा मिळणार आहे. ग्रामिण भागातील शेतकरी हा मार्गदर्शनापासुन वंचित राहतो, कधी लोकरीमावा तर कधी हुमणी प्रादुर्भाव तर कधी पावसामुळे त्याच्या चांगल्या उस शेतीचे नुकसान होवुन पीक हाती न लागता शेतक-यांवर मोठया प्रमाणांत आर्थिक बोजा पडतो, सद्यपरिस्थितीत तोटयातील शेती नफयात आणण्यासाठी हा प्रयत्न निश्चितच माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांचे संकल्पनेतून साकार होत आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सर्वश्री. निवृत्ती बनकर, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, संजय होन, साहेबराव कदम, मनेष गाडे, सोपानराव पानगव्हाणे, प्रदिप नवले, विलासराव वाबळे, फकिरराव बोरनारे, वेणुनाथ बोळीज, राजेंद्र काळपे, रामनाथ चिने, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शेतकरी सहकारी संघाचे संचालक वाल्मीक भास्कर, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, निवडक प्रगतशिल उस उत्पादक सभासद शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
कोपरगाव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद शेतक-यांच्या उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी थेट उपग्रहाद्वारे शेतीप्लॉटच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी झाला याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे सर्व मान्यवर संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *