
कोपरगाव प्रतिनिधी:-
स्त्री पुरुष समानता हा आपल्या घटनेने दिलेला हक्क आहे .त्यामुळे जर स्त्रियांना असमान वागणूक दिला जात असेल आणि त्याही पुढे जाऊन जर स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरही स्त्रियांवर अत्याचार होत असतील तर तो अक्षम्य गुन्हा आहे. अशा भयंकर परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणा संदर्भातील कायद्यांची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुणेस्थित डॉ. रेवती नाईक यांनी येथे केले.स्थानिक के .जे . सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कक्ष व आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांवर होणारे अन्याय व त्यासंदर्भातील कायदे’ या विषयावर आयोजित एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.प्रा. डॉ.नाईक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात महिला अत्याचार प्रतिबंध संदर्भातील २०१३ चा कायदा, २००५ चा संपत्ती मध्ये मुलींच्या हक्का संदर्भातील कायदा, लैंगिक छळवणुकीच्या संदर्भातील कायदा आदी. कायद्याची माहिती देखील उपस्थितांना दिली .या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.संतोष पगारे यांनी स्वागतपर भाषण केले .लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले .प्रा. वर्षा आहेर यांनी सूत्रसंचालन केले.ग्रंथपाल प्रा.नीता शिंदे यांनी आभार व्यक्त केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे, प्रा.एस. जी कोंडा ,डॉ. आर . ए जाधव, प्रा.कोमल म्हस्के प्रा.वृषाली पेटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
