संजीवनी एसएपीच्या २२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या :-श्री अमित कोल्हे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- एसएपी प्रशिक्षणातुन विध्यार्थ्यांनी मिळविले यश
कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या संजीवनीच्या 22 विध्यार्थांना नांमांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या असुन त्यातील ७ विध्यार्थ्यांना कंपनीने सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ४ लाख देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की काॅग्निझंट या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनिकेत संजय कोते, अनुजा भाऊसाहेब निचित, पोथिवाल हरप्रीतकुमार सुरजीतसिंग, क्षितिजा मधुकर गवारे, रिया भरत शेळके, स्नेहल सुनिल पिंपळे तर उटोपिया या बहुराष्ट्रीय कंपनीने सचिन अशोक जगताप यांची निवड करून या सर्वांना कंपन्यांनी सुरूवातीस रू ४ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. इन्वेनियो या कंपनीने प्रतिभा संवत्सरकर, राहुल रहाणे व निकिता सालके यांचीही रू ४ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. एनटीटी डेटा या कंपनीने विक्रम वसंत अलगट याची रू ३. ७५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. ऋषिकेश रत्नाकर रोडे याची क्रिप्ट टेक्नालाॅजीज या कंपनीने रू ३. ५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. कॅप्जेमिनी कंपनीने सोमेश राजेंद्र सोनवणे याची रू ३ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. तसेच डेवुज टेक्नालाॅजी या कंपनीने प्रविण आवारे, विप्रो कंपनीने परमेश्वर अंकुश इंगळे याची तर क्नुविक टेक्नालाॅजी या कंपनीने विशाल खातने व धिरज अनिल खेडकर यांची निवड केली आहे. टेक महिंद्रा या कंपनीने प्रतिभा कैलास संवत्सरकर, श्रृती शरद फळे, ऋतुजा संजय आरोटे, आरूंधती जितेंद्र देशमुख व तुषार संजय टोके यांची निवड केली.़
एसएपी या केंद्रामार्फत अडवान्सड बिझिनेस अँप्लिकेशन प्रोग्रामिंग (एबीएपी), मटेरिअल मॅनेजमेंट (एमएम), प्राॅडक्षन अँड प्लानिंग (पीपी), हुमन काॅम्प्युटींग मॅनेजमेंट (एचसीएम), फायनांसियल अकौंटींग (एफए) आणि सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन (एसडी) अशा प्रकारच्या कोर्सेचे प्रत्येकी २०० तासांचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना अधिकचे देवुन त्यांना मुलाखतींसाठी सक्षम केल्या जाते. एसएपी प्रशिक्षण घेतलेल्या इतर विद्यार्थ्यांची इतर कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी प्रक्रिया चालु असुन लकवरच त्यांच्याही निवडीची घोषणा होईल. एसएपी चे प्रशिक्षण संजीवनी व्यतिरीक्त विद्यार्थ्यांसाठीही खुले असुन असे अनेक विध्यार्थी या प्रशिक्षणाचा फायदा घेवुन नोकऱ्या मिळवित आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री श्री. शंकरराव व कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विध्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले. या सर्व विध्यार्थ्यांना डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए, जी. ठाकूर व एसएपी समन्वयक डाॅ. ए.बी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *