राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील:- वर्षा गायकवाड…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
मुंबई :राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.
वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू शकते.” असं असलं तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली आहे.
मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *