

कोपरगाव प्रतिनिधी:-
राजमाता जिजाऊ यांनी या देशात स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी छ शिवाजी महाराज यांच्या वर केलेले संस्कार अतुलनीय असून राजमाता जिजाऊंच्या संस्कार क्षम गुणांचा महिलांनी अंगीकार करावा असे मत अँड.सौ सोनल पोळ यांनी व्यक्त केले.
लोक स्वराज्य आंदोलन व माँ.जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमनाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज माता जिजाऊ यांच्या पुतळ्यास जिजाऊ प्रतिष्ठान व लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले
या वेळी बोलताना अँड.सौ पोळ पुढे म्हणाल्या की स्वराज्याची स्थापना करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी स्वप्न पाहिले होते मात्र हे स्वप्न साकार करण्याचे बीजारोपण त्यांनी बाल शिवबा यांच्यावर केलेल्या संस्कारात असून त्यानी बाल शिवबाना बालपणी नुसत्याच पौराणिक कथा सांगितल्या नाही तर त्या सांगताना धर्म,राजकारण,समाज कारण, परकीय धोरण हे सर्व संस्कार बाल शिवबा यांना दिले असून त्यांच्या सर्वोच्च संस्कारा मुळे छ शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व त्यांचा कारभार आजही जगात आदर्श आहे मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना मुलांवर संस्कार करण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र आपल्या पुढील पिढीला आदर्शवत घडवायचे असेल तर महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा संस्कारक्षम गुण अंगिकारले पाहिजे
या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ म्हणाले की राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद हे आदर्श माता व आदर्श युवा जगाला दिशा देऊ शकतात त्यामुळे या महान विभूतींचा आदर्श नेहमीच प्रेरणादायी राहील असे गौरवोद्गार काढले
या वेळी लोक स्वराज्य युवा आंदोलनाचे शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव,नगर सेवक संजय पवार ,प्रवीण शेलार,अशोक पवार लखन साठे आदी उपस्थित होते.
