
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी आज काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलेले . आजची मतदान टक्केवारी एकूण मतदानाच्या ८२ % असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली . याबाबत अधिक माहिती देताना चंद्रे म्हणाले कि ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज संध्याकाळी ५. ३० व. पूर्ण झाली आहे. तालुक्यातील ६३ हजार श्री आणि पुरुष मतदारांपैकी ५२ हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण मतदान ८२ % मतदान झाले आहे. यासती एकूण १११ मतदान केंद्रे उभे करण्यात आली होती . त्यासाठी जवळपास ६०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनासाठी असलेली सर्व आवश्यक काळजी घेण्यात आली होती.


सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले . कोकमठाण येथील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ मतदान बंद होते . मात्र त्वरित दुसरे यंत्र बसवून मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. तसेच घारी कासारे येथे निवडणूक केंद्राच्या बाहेर दोन गटात वाद झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परस्थिती नियंत्रणात आणली. गाव निहाय मतदान आकडेवारी १) उक्कडगाव – एकूण मतदार – १९७६ , झालेले मतदान १७४५, टक्केवारी -८८.३१ २ ) तिळवणी – एकूण मतदार-८१५ , झालेले मतदान- ७५५ , टक्केवारी -९२.६४ ३) अंजनापूर – एकूण मतदार- १३०७ , झालेले मतदान- ११६७ ,टक्केवारी – ८९.२९ ४) घारी – एकूण मतदार -१२११ , झालेले मतदान- १०४१ – टक्केवारी – ८५. ९६ ५ )मानेगाव – एकूण मतदार – ७५६ , झालेले मतदान- ६७६ , टक्केवारी -८९. ४२ ६ )मालेगाव थडी – एकूण मतदार-२१८० ,झालेले मतदान-१९०९,टक्केवारी-८७.५७ ७)सांगवी भुसार -एकूण मतदार- २३५३ ,झालेले मतदान -१३१९,टक्केवारी – ५५.६७ ८) वेळापूर- एकूण मतदार -२४९६ ,झालेले मतदान – २०३९ ,टक्केवारी – ८१.६९ ९) जेऊरपाटोदा – एकूण मतदार- २१०५,झालेले मतदान – १६२३ ,टक्केवारी – ७७.१० १०)काकडीमल्हारवाडी-एकूण मतदार-२६८८,झालेले मतदान- २३८२ ,टक्केवारी -८८.६२ ११)नातेगाव -एकूण मतदार -१७३३ -झालेले मतदान -१५३३ ,टक्केवारी -८८. ४६ १२)कासली -एकूण मतदार-१३१४ ,झालेले मतदान -११४५, टक्केवारी – ८७.१४ १३)ओगदी – एकूण मतदार- ७३४ ,झालेले मतदान – ६६४ ,टक्केवारी – ९०.४६ १४)अंचलगाव- एकूण मतदार- ८६१, झालेले मतदान – ७१८ ,टक्केवारी- ८३.३९ १५)कोळगाव थडी -एकूण मतदार-१६१४ ,झालेले मतदान- १३९४,टक्केवारी -८३.३७ १६)मायगाव देवी- एकूण मतदार- १४९५,झालेले मतदान- १३३७,टक्केवारी -८९. ४३ १७)हिंगणी -एकूण मतदार- ७१९,झालेले मतदान – ६५७ ,टक्केवारी – ९१. ३८ १८)रवंदे – एकूण मतदार- ३७४३ ,झालेले मतदान -३०७५ ,टक्केवारी -८२. १५ १९)संवत्सर-एकूण मतदार – ८८४७ -झालेले मतदान- ६६२३ ,टक्केवारी – ७४.८६ २०)देर्डे चांदवड – एकूण मतदार -१३९९, झालेले मतदान -११९९ ,टक्केवारी -८५.७० २१)मढी खु. -एकूण मतदार -१७१९ झालेले मतदान -१४६४, टक्केवारी – ८५.१७ २२)मढी बु.- एकूण मतदार -२२९४ ,झालेले मतदान – १९१४ ,टक्केवारी- ८३.४४ २३)धोंडेवाडी -एकूण मतदार – ७८१ ,झालेले मतदान -६८८,टक्केवारी -८८ .०९ २४)सोनारी – एकूण मतदार – ९४८ ,झालेले मतदान -८१७,टक्केवारी -८६.१८ २५)आपेगाव -एकूण मतदार- १३७१, झालेले मतदान -१२७० ,टक्केवारी -९२.६३ २६)येसगाव – एकूण मतदार -३४२८ ,झालेले मतदान -२७६२ ,टक्केवारी -७९.७० २७)टाकळी -एकूण मतदार – ३४९३ ,झालेले मतदान -२७५२,टक्केवारी – ७८.७९ २८)कोकमठाण -एकूण मतदार -६५८७,झालेले मतदान -५४९७ ,टक्केवारी -८३.४५ २९)जेऊर कुंभारी- एकूण मतदार-२९०५ ,झालेले मतदान-२३७४ ,टक्केवारी -८१.७२ नुकतेच २९ ग्रामपंचायती इलेक्शन साठी पुर्वीचे कोपरगाव शहराचे पी.आय. राकेशजी मानगावकर यांची खास नियुक्ती करण्यात आली. ह्या नियुक्ती ला उत्तर म्हणून २९ ग्रामपंचायती च्या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून मानगावकर साहेब अक्षरशः डोळ्यात तेल घालून जातीने ज्या ठिकाणी मतदार चालु होते त्या ठिकाणी स्वतः पहाणी करून पुन्हा एकदा आपला वलय दाखवुन कोपरगाव ग्रामीण ला आपला दबदबा दाखविण्यात आला .


