पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुरचित्रवाणीवरुण घोषणा करताच पूणतांबा येथे शेतकऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष:-पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (पूणतांबा):- केंद्र सरकारने आज शेतकरी विरोधी तिन कायदे रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी ही घोषना दुरचित्रवानीवरुन प्रसिद्ध करताच शेतक-यांनी आनंद ऊत्सव साजरा केला.
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन वर्षापुर्वी पुणतांब्यातुन शेतकरी संपाला सुरुवात झाली होती. याच गावात आज शेतकरी एकत्र आले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या शेतकरी पुतळ्याला त्यांनी हार घालुन विजयाच्या घोषना दिल्या. फटाके फोडले. एकमेकांना पेढे भरविले.

सरपंच डाँ धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, माजी सरपंच सुधाकर जाधव, सुभाष वहाडणे,गणेश साखर कारखाना संचालक राजेंद्र थोरात, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्राने शेतक-यांच्या पिकाला हमी भाव द्यावा. विजपुरवठा व पाणी प्रश्नाबाबत नविन कृर्षी आराखड्यात सवलती द्याव्यात अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

फोटो ओळी:- कृर्षी कायदे रद्द होताच शेतकरी एकत्र जमले फटाके फोडून आनंद ऊत्सव साजरा केला. समावेत सरपंच डाँ धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, शैलेश कुलकर्णी. आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *