कोपरगाव शिवसैनिकांनी शिवतिर्थावर हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९ वी पुण्यतिथी बुधवार दि.१७ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. त्यानंतर कोपरगाव शहर आणि तालुक्यातील शिवसेनेच्या शिवसैनिकाकडुन हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पदाधिकाऱी मुंबई येथे रवाना झाले आहे.शिवतिर्थावर जाण्यासाठी गाडीला सुनिल भैय्या तिवारी शिर्डी लोकसभा विस्तारक सचिव युवा सेना यांच्या हस्ते नारळ फोडून उत्त्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी झेंडा दाखवुन पुढील प्रवासाला सुरुवात झाली.यावेळी राजेद्र झावरे म्हणाले की,करोडो हिंदुचे हदयस्थान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन मराठी माणसाला न्याय मिळवुन दिला आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.माझ्या उध्दवला साभाळा या आठवणींना उजाळा देत राजेंद्र झावरे म्हणाले की,आम्ही सर्व शिवसैनिक उध्दवसाहेब यांच्या बरोबर असुन उध्दव साहेब आणि आदित्य ठाकरे संपुर्ण महाराष्ट्राला साभाळत आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला हवा हि इच्छा उध्दवसाहेब ठाकरे यांनी पुर्ण केली आहे.शिर्डी लोकसभा विस्तारक सचिव युवा सेनेचे सुनिल भैय्या तिवारी म्हणाले की,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे युवानेते आदित्य ठाकरे पुढे नेत असुन संपुर्ण भारतात त्यांचे सारखे काम कोणीच करत नाही.युवा वर्गाने पुढे येवुन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे.शहरप्रमुख कलविंदसिंग दडियाल म्हणाले की,भारताला वेगळी अशी ओळख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असुन शिव तिर्थावर गेल्यावर नविन उर्जा आम्हाला मिळत असती करोडो लाखो हिंदुचे श्रध्दास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे यांचा आज ९ व्या स्मृती दिना निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या विचारावर कामकाज आम्ही करत असुन सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडवत राहु.यावेळी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजाभाऊ झावरे, कर्मवीर शंकरराव काळे सह कारखान्याचे व्हा चेअरमन सुधाकर रोहम,सुनिल भैय्या तिवारी, असलम शेख,शहरप्रमुख कलविंदर सिंग दडियाल,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले,किरण खर्डे, हसन भाई पटेल, इरफान शेख, प्रफुल्ल शिंगाडे, राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,सुनिल शिलेदार, वाल्मिक लहिरे चंद्रशेखर म्हस्के,रमेश गवळी गट प्रमुख प्रवीण शिंदे, अशोक पवार, बाळासाहेब साळुंके, महिला आघाडी शहर प्रमुख राखी विसपुते, नगरसेविका वर्षा शिंगाडे, अश्विनीताई होणे, आक्षिता आमले,युवानेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, भुषण वडांगळे, प्रविण देशमुख, भाऊसाहेब जाधव, मधुकर पवार, प्रकाश पवार, राहुल देशपांडे, योगेश मोरे, विकास शर्मा, वसीम शेख, श्रीपाद भसाळे, योगेश उशीर, वैभव गिते, निलेश पवार, अविनाश धोक्रट, नरेंद्र बैरागी, वैभव हलवाई, गौरव गुप्ता, अभिषेक भारसकर, सागर सोमवंशी, दिपक बर्दे, दिपक जाधव, मयुर दळवी, निशांत झावरे, मंगेश देशमुख, अक्षय वराडे, आकाश कर्डिले, दिनेश भालेराव, मच्छिंद्र शिरसाट, मुकुंद थोरात, रवी कोपरे, आकाश खैरनार, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *