
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या सार्वत्रिक निकालात सत्ताधारी आ. आशुतोष काळे गटाला जोरदार धक्का बसला असून भाजपच्या माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे गटाला २२ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या काळे गटाला फक्त ८ ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे तर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या संवत्सर ग्रामपंचातीवर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांना आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले आहे.
कोल्हे गट जेऊर कुंभारी ९ पैकी ७ जागा, सोनारी ७ पैकी ४ जागा, वेळापूर १० पैकी ६ जागा, ओगदी ७ पैकी ४ जागा, आंचलगाव ७ पैकी ६ जागा, नाटेगाव ९ पैकी ७ जागा, उक्कडगाव ९ पैकी ५ जागा, मनेगाव ७ पैकी ५ जागा, माळेगाव थडी ९ पैकी ८ जागा, अंजनापूर ७ पैकी ४ जागा, रवंदे १३ पैकी १० जागा, देर्डे चांदवड ९ पैकी ७ जागा, धोंडेवाडी ८ पैकी ५ जागा, जेऊर पाटोदा ११ पैकी ६ जागा, येसगाव ११ पैकी ९ जागा, टाकळी १३ पैकी ८ जागा, काकडी ११ पैकी ८ जागा, अपेगाव ९ पैकी ८ जागा, कासली ९ पैकी ५ जागा,घारी ९ पैकी ५ जागा, रामपुरवाडी ११ पैकी ६ जागा तर शिंगवे ११ पैकी ८ जागा मिळवत कोल्हे गटाने २२ ग्रामपंचायतीवर आपला विजयाचा झेंडा रोवला आहे.
काळे गट कोळगाव थडी ९ पैकी ७ जागा, मायगाव देवी ९ पैकी ९ जागा, मढी बु ९ पैकी ६ जागा, मढी खु ९ पैकी ५ जागा, हिंगणी ७ पैकी ५ जागा, कोकमठाण (काळे शिवसेना युती) १७ पैकी १५ जागा, तीळवणी ७ पैकी ७ जागा तर जळगाव एलमवाडी ११ पैकी ८ जागा मिळवत काळे गटाने तालुक्यात ८ ग्रामपंचायत वर आपला विजय मिळवला आहे.
परजणे गट संवत्सर १७ पैकी १४ जागा वर विजय मिळवत बहुमताने सत्ता ताब्यात राखली आहे.
बिनविरोध सांगवी भुसार गावची ग्रामपंचायत राजेंद्र जाधव व राजेश परजणे यांच्या प्रयत्नाने ९ पैकी ६ जागा बिनविरोध करत स्वतःकडे राखल्या तर ३ जागाचे प्रत्यक्ष मतदान होऊन त्यात २ जागा कोल्हे गटाने तर १ जागा काळे गटाने जिंकली.
