एस टी कर्मचारी यांच्यावर संप करण्याची वेळ हे राज्य सरकारचे अपयश:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एका बाजूला केंद्र सरकार सरकारी उद्योगाची विक्री करत असताना दुसरी कडे एस टी कर्मचारी महामंडळाचे विलीगिकरन करावे या मागणी साठी संप जातात हे राज्य सरकारचे अपयश आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून या संपास लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य स्वीकारून एस टी कर्मचारी काम करतात मात्र अल्प पगार शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत त्यामुळे एस टी कर्मचारी यांनी वेळोवेळी एस टी मंडळाचे शासकीय सेवेत विलगिकरन व्हावे अशी मागणी केली मात्र शासन या कडे दुर्लक्ष करत आहे तसेच कर्मचारी यांचे निलंबन करण्याची धमकी देऊन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे
सद्या दिवाळीचा सण असून राज्यातील रस्त्याची दुरवस्था व वाढत्या इंधन दर वाढीमुळे अनेक माहेर वासींनी प्रवासात एस टी बसचा आधार घेतात मात्र सरकारचे या सर्वांकडे दुर्लक्ष असून त्वरित एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे
यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे सुजल चंदन शिव व सोमनाथ ताकवले तसेच एस टी संप करी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *