आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक आठ नोव्हेंबर 202,1सोमवार सकाळी दहा वाजता कोपरगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम समाजबांधवांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला . यावेळी सर्व समाज बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले . यावेळी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय वायखिंडे ,बाळासाहेब लवांडे , सुरेश कांगुणे, मनोहर शिंदे, भरत आगलावे, चंद्रकांत शेजुळ ,नंदु लांडगे, इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *